बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मग फडणवीसांनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा?- अमोल मिटकरी

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. आपल्याकडे याबाबतच्या संवादाचा 6.3 जीबीचा पेन ड्राईव्ह असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता.

सीताराम कुंटेंनी पाठवलेल्या अहवालानुसार ज्या काळात फोन टॅपिंग केले त्या काळात भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नाहीत. त्यासोबतच वर्ष 2020 मध्ये काही अपवाद वगळता सर्व बदल्या या पोलिस अस्थापना मंडळ-1 च्या शिफारशीच्या आधारे शासनाने केल्या असल्याचं अहवालात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावं, असा सवाल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेत्यांना केला आहे.

दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर अपक्ष आमदांराना भाजपला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्याच्या आयुक्त असताना ‘त्या’ खंडणी गोळा करत असायच्या; रश्मी शुक्लांवर ‘या’ नेत्याचे गंभीर आरोप

भाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत- मनीषा कायंदे

10वी आणि 12 वीच्या परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील- नितीन गडकरी

ऐकावे ते नवलच! ना भारतात, ना परदेशात, बापाने केली बाळासाठी चक्क चंद्रावर जमिनीची खरेदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More