धक्कादायक! अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडले, 9 वर्षीय चिमूकल्याचा चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

Amravati Accident | महाराष्ट्रात अपघात सत्र काही थांबत नाहीयेत. मुंबई, पुणे यासह अनेक ठिकाणी भयंकर अपघात झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना आता रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. अशात अमरावतीत एक भयंकर अपघात घडला आहे.

शहरातील प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या भरधाव (Amravati Accident ) सीटीबसने रस्त्यावरून जाणाऱ्या चौघांना चिरडले. या भीषण अपघातामध्ये 9 वर्षाच्या चिमूकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडले

अमरावतीमधील सायन्स कोर मैदानासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने या बसची तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम गोविंद निर्मळे (वय 9) या मुलाचा बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर, अजून तीन जण हे गंभीर जखमी झाले आहेत.

या तिघांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर (Amravati Accident ) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने नागरिकांचा संताप पाहता सायन्सकोर मैदानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, आज (14 जुलै) सकाळी शिरसगाव कसब्यातील (Amravati Accident ) रहिवासी असलेल्या नर्मदा निर्मळे या त्यांचा नातू आणि दोन नातीनसोबत सायन्स कोर्सच्या बस डेपो परिसरातून रस्त्याने जात होत्या. यावेळी अमरावती शहरात असणाऱ्या भरधाव सीटीबसने या चौघांना जोरदार धाड दिली. यात प्रीतम (9 वर्षीय मुलगा) हा बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर आजी व दोन नाती या जखमी झाल्या आहेत.

News Title –  Amravati Accident news update 

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई-पुण्यात घर घ्यायचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाकडून महत्वाची घोषणा

वर्षांनंतर सलमान-ऐश्वर्या आले पुन्हा एकत्र?, ‘त्या’ फोटोने चर्चेला उधाण

“महाराष्ट्रात जातीयवाद सुरूये, माझ्या मतदारसंघात 40 टक्के दलित व मुस्लिम तरी मी निवडून येतो”

“…तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही”; बच्चू कडू यांची मोठी घोषणा

मुंबई, कोकणसह राज्यातील ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता