बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील वरूडचे तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. अमरावती न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. भुयार यांना तीन कलमांन्वये दोषी ठरवण्यात आलं आहे.

वरुड येथे 2013 साली यासंदर्भातील प्रकार घडला होता. सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची यशोगाथा तयार करण्याचं काम सुरु असताना आमदार देवेंद्र भुयार काही लोकांना घेऊन तिथं आले होते. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा तसेच मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.

ज्वारी खरेदी केंद्रं उशिरापर्यंत का बंद आहेत?, माझा फोन का कट केला?, असे प्रश्न त्यांनी जोरजोरात ओरडून विचारले होते. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांनी 27 फेब्रुवारी 2013 रोजी वरुड पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कलम 353, 183, 294, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 15 एप्रिल 2013 रोजी या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने भुयार यांना दोषी ठरवलं. कलम 353 अन्वये त्यांना तीन महिने सक्तमजुरी आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास त्यांना भोगावा लागेल. तसेच कलम 294 अन्वये दोन महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस साधा कारावास व कलम 506 अन्वये 3 महिने सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तीनही शिक्षा एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. दुसरीकडे रक्कम वसुल झाल्यानंतर यातील 10 हजार रुपये फिर्यादी राम लंके यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

भारतीय गोलंदाज ठरले लॉर्ड्सवर ‘बाजीगर’, भारताचा इतक्या धावांनी विजय

शरद पवारांचं अचानक ओबीसींप्रति प्रेम आज उफाळून आलं- गोपीचंद पडळकर

अफगाणिस्तानमध्ये ‘इतके’ भारतीय नागरिक पडलेत अडकून?; समोर आली आकडेवारी!

तालिनबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा केंद्राला महत्त्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More