देश

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं- अमरिंदर सिंग

नवी दिल्ली | दिल्लीत शेतकरी आंदोलनात झालेल्या हिसांत्मक घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पंजाबमध्ये हाय अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं, असं आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. तसेच. राज्याचे DGP दिनकर गुप्ता यांना आदेश देत राज्यात हिंसात्मक घटना होऊ नयेत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आलं आहे.

शेतकरी आंदोलनामध्ये झालेली हिंसा काही घटकांकडून करण्यात आली असावी, असा संशय अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केला आहे.

समाजकंटकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला ठेच पोहोचल्याचं अमरिंदरसिंग म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही”

‘आता मला लाज वाटायला लागली आहे’; प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला

“आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?”

केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये- शरद पवार

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका- कंगणा राणावत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या