“देवेंद्रजी खरंच 30-35 पोळ्या खायचे?”, अमृता फडणवीस म्हणाल्या…
मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पुरणपोळी खाण्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात यावर बरीच चर्चा झाली. आता माझा कट्ट्यावर बोलताना अमृता फडणवीसांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र मला त्यांच्याबद्दल खरं सांगतात. लग्नाआधी देवेंद्रजींनी आणि त्यांच्या मित्रांनी लग्नाच्या पंक्तीत सर्वात जास्त पुरण पोळ्या खाण्याची शर्यत लावली होती. तेव्हा देवेंद्रजींनी 30-35 पोळ्या खाल्ल्या होत्या हे खरं आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी लग्नानंतर माझ्या समोर कधीच अर्धी पोळी देखील खाल्ली नाही हे सुद्धा खरं आहे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक सवयी देखील या कार्यक्रमात सांगितल्या आहेत.
थोडक्यात बातम्या –
क्रिकेट जगतात खळबळ! जडेजानं दिला कर्णधारपदाचा राजीनामा
“शरद पवार मुख्यमंत्री, विलासराव पत्र घेऊन आले अन्…”, सुशिलकुमार शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
भाजपचा ‘हा’ बडा नेता अडचणीत; अटकेची टांगती तलवार कायम
इम्तियाज जलील म्हणतात, “मला आता हालचालींवर लक्ष द्यावं लागेल”
“एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”; पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका
Comments are closed.