‘त्या’ व्हिडीओमुळे अमृता फडणवीस अडचणीत?

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnvis) या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असतात. नुकतंच त्यांचं आज मैने मूड बना लिया हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला काहींनी पसंती दिली. तर अमृताजींच्या आवाजावरून नेहमीप्रमाणेच त्यांना ट्रोलही केलं गेलं. पण नुकतंच अमृता यांनी रील स्टार रियाझ अलीसोबत आज मैने मूड बना लिया गाण्यावर रील बनवली आहे. आता त्यांच्या या रीलवरून त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जातीय. आता या रीलमुळं त्या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्यात. आता तुम्ही म्हणाल रील बनवली तर त्यात काय. पण अमृता फडणवीस नेमक्या रील बनवल्यामुळं वादाच्या भोवऱ्या का अडकल्यात हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात.

अमृता फडणवीस आणि वाद हे समीकरण आता सगळ्यांना ठाऊकच झालयं. विशेष म्हणजे त्या राजकारणात सक्रिय नसतानाही त्यांना राजकारणात ओढलं जातं किंवा त्या स्वत:हून राजकीय घडामोडींवर बोलत असतात. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर राजकारणात सक्रिय नसताना फार कमी नेत्यांच्या बायकांना राजकारणात ओढलं गेलं किंवा कुठल्याच नेत्यांच्या बायका राजकीय मुद्द्यांवर फारसं बोलताना दिसल्या नाहीत. पण खासकरून जेव्हा महिलांचा मुद्दा येतो तेव्हा विरोधी पक्षांकडून अमृता फडणवीसांना आवर्जून टोला लगावला जातो. याचं ताजं उदाहरण म्हणजे शिवसेना नेत्या सुष्मा अंधारेंनी उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात अमृता फडणवीसांचं घेतलेलं नाव.

आता पुन्हा एकदा तसच काही घडताना दिसतंय.

सध्या अमृता यांचं आज मैने मूड बना लिया या गाण्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरूये. आता या गाण्याची अमृता यांनी रियाझ अलीसोबत बनवलेली रीलही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतीये. या रीलला काही नेटकरी विरोध करत असतानाच आता या रीलवर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंगळे यांनी आक्षेप घेतलाय. अमृता यांची ही रील सरकारी बंगल्यावर शूट करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केलाय. तसेच सरकारी बंगल्यावर रील बनवण्यासाठी त्यांनी सरकारची लेखी अधिकृत परवानगी घेतली होती का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

माध्यमांशी बोलताना पिंगळे यांनी अमृता फडणवीसांना पुरवल्या जाणाऱ्या वाय दर्जाच्या सुरक्षेवरही आक्षेप घेतलाय. अमृता फडणवीस यांना बेकायदेशीर पद्धतीनं वाय दर्जाची सुविधा दिलीय. पण खर तर ही सुविधा फक्त सांविधानिक पदाला दिली जाते. पण सत्तेचा गैरवापर करत अमृता फडणवीसांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. असा दावाही त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More