बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

मुंबई | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कायम आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असतात. विरोधी पक्षावर ते कायम टीका करताना दिसतात. मात्र त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच आता अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं चर्चेचा विषय ठरत आहे.

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अमृता यांचं नवं गाणं प्रदर्शित झाली आहे. या नव्या गाण्याचं नाव ‘गणेश वंदना’ असून ते ऐन गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रदर्शित होताच सोशल मीडियावर गाण्याचा धुमाकूळ पहायला मिळत आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत गाण्याची छोटी झलक दाखवली आहे. सोशल मीडियावर याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तर काहींनी या गाण्यावरून त्यांना ट्रोल करण्यास देखील सुरूवात केली आहे. अनेकांनी अमृताचं कौतूक केलेलंही पहायला मिळालं. एकंदरीत नवीन गाण्यावर भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांना गाण्याची आवड असल्यामुळं ते नवनवीन प्रयोग करताना पहायला मिळतात. कधी कधी काही गाण्यांमुळे त्यांना टीकांचाही सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर मात्र त्यांच्या नवीन गाण्याची चर्चा रंगली आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

काश्मिर प्रश्नाबाबत तालिबानचा यु-टर्न; आता म्हणतात…

‘जो चेहरा नेहमी हसताना पाहिला तोच चेहरा आज…’, शेहनाजला पाहून ‘या’ अभिनेत्याची भावूक पोस्ट

केंद्र सरकारचा पीएफ खातेधारकांना दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमेरिकेला ‘इडा’ चक्रीवादळाचा मोठा फटका; पाहा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ

उद्धटपणा भोवला! राणू मंडलवर पुन्हा आली रस्त्यावर गाण्याची वेळ, पाहा ‘हा’ व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More