Top News महाराष्ट्र मुंबई

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

मुंबई | अमृता फडणवीस यांचं गाणं येणार असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे

येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या नवीन येणाऱ्या गाण्याबद्दल माहिती दिली होती.

‘पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये,’ अशी ऑनलाइन याचिका हनुमंत ढोमे नामक नेटकऱ्याने केली आहे. या ऑनलाइन याचीकेला इतर नेटकऱ्यांनी काही वेळातच मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं आहे.

दरम्यान, पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे, असं याचीकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”

आम्ही शेतकऱ्यांच्या सल्ल्यांवर विचार करायला तयार आहोत पण…-नितीन गडकरी

“शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं, काँग्रेस शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही”

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल- संजय राऊत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या