“ठाकरे सरकार हे जगातील सर्वात भ्रष्ट सरकार, शरद पवारांच्या…”
मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद चालू आहे. ईडीच्या राज्यातील कारवाईनं वाद आणखीनच वाढला आहे. अशातच आता अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्य सरकार प्रचंड उदासिन आहे, राज्यात चालू असलेला एसटी कामगारांचा संप मिटणं महत्त्वाचं आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार फक्त राज्यात नाहीतर देशासह जगातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यावर देखील अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही, पण हा हल्ला का झाला याचं कारण देखील शोधलं पाहिजे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
दरम्यान, अमृता फडणवीस या मुंबईत कलाकारांच्या महारोजगार मेळाव्याला संबोधित करत होत्या. या कार्याक्रमाला अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर देखील उपस्थित होते.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच; 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली
किरीट सोमय्यांना अटक होणार?; न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अनुष्का शर्माला आवडली हिरव्या वाटाण्याची भाजी अन् आळूची वडी; फोटो शेअर करत म्हणाली…
“शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार”
ईडीच्या कारवाईने दिल्लीत गोंधळ; काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची चौकशी सुरू
Comments are closed.