बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ये भोगी’ म्हणत अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई | मशीदीवरील भोंग्यावरून पेटलेलं वातावरण काही केल्या शांत होत नाहीये. मनसे प्रमुख राज ठाकरेंनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंगे उतरवण्याची धडक मोहिम राबवल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. ये भोगी काही तरी शिक आमच्या योगीकडून, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर राज्यात गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांच्या भोंगे उतरवण्याच्या मोहिमेचं राज ठाकरेंनी देखील कौतूक केलं आहे. भाजपनं उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्याची मोहिम राबवल्यानं राज्यात वाद वाढला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याअगोदरही ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र यावेळी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानं शिवसेनेकडून अमृता फडणवीस यांना उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मी कधीच आई होऊ शकत नाही”, भर कार्यक्रमात अभिनेत्री ढसाढसा रडली

मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के; ‘हा’ स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

हौसलों की दौड! दिव्यांग मुलीनं जिंकली सर्वांची मनं, प्रेक्षकही भावूक; पाहा व्हिडीओ

‘समान नागरी कायदा’ लागू करण्याची जोरदार मागणी; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

शेलारांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More