‘…म्हणून मला मामी म्हणतात’; अमृता फडणवीसांनीच सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

नागपूर | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पहिल्यांदाच आपल्याला मामी का म्हणतात? यावर भाष्य करत ट्रोलर्सचा समाचार घेतलाय. नागपूर येथे पार पडलेल्या अभिरुप न्यायालयातील एका सवालाचा जवाब देताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मामू म्हणतात. म्हणून मलाही मामी म्हणतात. पण कोणी काही म्हटलं तरी मला फरक पडत नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.

लोक मला ट्रोल करत नाही. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या फेक ट्रोलर्सकडूनच मला ट्रोल केलं जातं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

सक्रिय राजकारणात जाणार का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर जेव्हा तुम्ही राजकारणात जाता तेव्हा लोकांचं आयुष्य बदलते. मी घर आणि मुलगी सांभाळते. राजकारणासाठी पूर्णवेळ नाही देऊ शकत असं म्हणत त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

जे 24 तास राजकारणासाठी देतात आणि राजकारणात जे लायक आहे त्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे. देवेंद्रजी 24 तास समाजासाठी झटत असतात. मी राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मला सध्या राजकारणात यायचं नसल्याचं अमृता यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe