बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीस राजकारणात येणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) अनेकदा राजकीय विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेकदा महाविकास आघाडीवर देखील टीका केली आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीस राजकारणात येणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. (Amrita Fadnavis will never enter politics, said Devendra Fadnavis)

राजकारणात सगळ्या गोष्टींना माणसाने तयार असायला हवं. पण यात अनेकांचे चेहरे उघड झाले. अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वत:चा छंद, त्यांच्या आवडी आहेत. पण जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केलं जातंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राजकारणात मी पातळी सोडली नाही आणि कधीच सोडणार नाही. अमृता फडणवीस कधीच राजकारणात येणार नाही हे मी बोललेला जपून ठेवा, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे.

दरम्यान, आम्ही सरकार पाडणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत. मागील दोन वर्षात जेवढं लुटता येईल, तेवढं लुटण्याचं काम केलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईचं टेन्शन वाढलं! आदित्य ठाकरेंनी दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

काळजी घ्या! ‘या’ व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जास्त धोका

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना अलर्ट जारी

कॅप्टनने 8 फिल्डर लावले अन् जडेजाने टाकला ‘तो’ थ्रिलर बाॅल पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More