बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देवेंद्र मध्यरात्री वेश बदलून…’; अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | आमच्यातील वाटाघाटीसाठी आणि चर्चांसाठी सगळे आमदार झोपल्यावर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो, चर्चा करायचे आणि आमदार झोपेतून उठायच्या आतमध्ये मी हॉटेलवर यायचो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सांगितलं. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

देवेंद्र अगदी रात्री एक पर्यंत काम करायचा. रात्री एकला उठून जॅकेट वैगेरे घालून, गाॅगल घालून जायचा. कधी कधी मलाही ओळखता यायचं नाही. मी त्याला विचारायचे काही नवीन सुरू आहे का? तर उत्तर न देता तो निघून जायचा. मला नेहमी वाटायचं की काहीतरी राजकीय गुपित आहे, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

ठाकरे सरकारला जे सांगायचं होतं ते अडीच वर्षांपूर्वी सांगितलं आहे. त्यांना आता त्यांचं उत्तर मिळालं असेल. आता लोकांच्या मनात एवढी जनजागृती झाली आहे. त्यामुळे आता काही सांगायची गरज नाही. मी फक्त एवढच म्हणेन की ‘मजबूत लोक नेहमी कठीण परिस्थितीत टिकतात’, असं त्या पुढे म्हणाल्या.

दरम्यान, देवेंद्र आणि मी कधी भेटायचो हे आमच्यासोबत असणाऱ्या आमदारानांही माहित नव्हतं. सगळे आमदार झोपले की त्यांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या आधी परत यायचो, असं व्यक्तव्य एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना केलं होतं.

थोडक्यात बातम्या

“शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील उधारीचा माल”

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती समोर

शिवसेनेला आणखी एक झटका?; शिवसेना खासदाराच्या पत्राने टेन्शन वाढलं

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘मंत्रीपदाची संधी मिळाली तर…’; विजय शिवतारेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More