बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?’; अमृता फडणवीसांचा सवाल

मुंबई | राज्यात एनसीबीने कारवाई केलेल्या कथित क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हे सर्व प्रकरण हा फर्जीवाडा असल्याचा उल्लेख करत आहेत. तसेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिम असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यातच आता नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीवर आरोप केले आहेत. फडणवीस यांचा ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अमृता फडणवीस यांचा ड्रग्स पेडलरसोबतचा फोटोदेखील मलिक यांनी ट्विट केला आहे. त्यावरून अमृता फडणवीस यांनी मलिकांना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे.

चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते, अशी टीका अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केली आहे. अमृता फडणवीस या ट्विटरवर चांगल्याच सक्रिय असतात. तसेच त्या आपलं विविध विषयावर परखड मत व्यक्त करत असतात.

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हणाले आहेत की, त्यांचे आणि जयदीप राणाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. जयदीप राणाचा फोटो देखील मलिक यांनी शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांनी एक गाणं बनवलं आहे. त्या गाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता.

दरम्यान, जे गाणं अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या गाण्याचा फायनान्स हेड हा जयदीप राणा आहे. तसेच फडणवीस यांच्या म्हणणानूसारच सर्व ड्रग्सचे खेळ सुरू आहेत, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे.

पाहा ट्विट – 

थोडक्यात बातम्या – 

‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असाल तर…’; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

‘सिर्फ घर नहीं, यहां तो पुरी सरकारही…’; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

‘भारतात कधी मुस्लीम व्होट बँक नव्हतीच, फक्त…’; असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक वक्तव्य

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे…’; राजू शेट्टींची जहरी टीका

फडणवीसांच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दात प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More