‘…जबाबदार वाझे’; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणावर अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट
मुंबई | सध्या राज्यभर देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला होता. मात्र अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर सूचक असं वक्तव्य केलं आहे.
व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू, असं म्हणत वाझे प्रकरणाच्या आडून त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. अमृता फडणवीसांच्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे यावरून राजकीय वर्तुळात आणि सोशल माध्यमांवर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. मात्र त्यांच्या ट्विटमुळे चर्चेला विषय दिला आहे हे मात्र नक्की.
अमृता फडणवीस आपल्या फोटोंमुळे, आपल्या गाण्यांमुळे आणि राजकीय वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यासोबतच अमृता फडणवीस यांचे फोटोही सोशल माध्यमांवर धुमाकुळ घालत असतात.
दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी आपलं नवं गाणं सादर केलं होतं. कुणी म्हणालं वेडी कुठली, कुणी म्हणालं खुळी” असे बोल असलेले त्यांच नवं गाणं होतं. तर स्वत: अमृता फडणवीस यांनी आपल्या ‘ट्विटर’ हँडलरवर त्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता.
कोण कोणास म्हणाले –
*व्यवहार माझे,*
*जबाबदार वाझे!*
सांगा पाहू …….— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 19, 2021
थोडक्यात बातम्या-
वाह! क्या बात है ‘कजरारे’ गाण्यावर कृणाल पंड्याने लावले पत्नीसोबत ठुमके, पाहा व्हिडीओ
‘मी बंगळुरू सोडलं नाही’; हितेशा चंद्राणीचं इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्टीकरण!
“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर कूल दिसा भिकाऱ्यासारखं नाही”
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!
विराटपेक्षा रोहितच लय भारी! संघाची सूत्र हाती आल्यावर निसटलेला सामना आणला खेचुन
Comments are closed.