बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोहित पवारांच्या त्या ट्विटला अमृता फडणवीसांचा प्रतिसाद; म्हणाल्या…

मुंबई | जागतिक महिला दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीझ झालं होतं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत अमृता फडणवीसांच्या गाण्याचं कौतुक केलं होतं. पवारांच्या त्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे.

धन्यवाद रोहित भाऊ, असं म्हणत अमृता फडणवीसांनी रोहित पवारांचे आभार मानले आहेत. अमृता फडणवीसांनी आभार मानताना रोहित पवारांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीसांनी नव गाणं प्रदर्शित झालं होतं.

काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा वापर करत आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या गाण्याची निर्मिती टी-सिरीजने केली आहे. हे गाणं नाट्य संगीतावर आधारित आहे. भावनांच्या या जगतात गडबडले मी गडगडले, असा उल्लेख या गाण्यात आहे. काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतं आहे. मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.

 

थोडक्यात बातम्या-

‘वैश्विक नेता असल्याचा दावा फोल, मोदींची लाट ओसरली’; ‘या’ भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर

‘या’ कारणाने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; सहा महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना गुगलचा मोठा झटका; केली ‘ही’ मोठी घोषणा

‘शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…’; नाना पटोलेंचा रामदेवबाबा अन् अंबानींना संतप्त सवाल

“सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More