बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्तनपानाला अजुनही आपल्याकडे…’; मातृदिनानिमित्त अमृता रावने व्यक्त केली खंत

मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री अमृता रावने मातृदिनानिमित्तच्या निमित्ताने  मातृत्वाच्या अनुभवावर भाष्य केलं आहे. ईटी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने मातृत्वाचा अनुभव सांगितला आहे. अमृता आणि आरजे अनमोल यांच्या लग्नाला जवळपास 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांना ‘वीर’ नावाचा मुलगा आहे. सध्या अमृता आपल्या मुलासोबत वेळ घालवत आहे.

हे खूप खास वाटतं. मागच्या वर्षी मातृदिनाला माझं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं आणि मी गरोदर होते. माझं पोट बाहेर आलं होतं. पण हे क्षण खास आहेत. आता तो माझ्या कुशीत आहे. याहून छान काय असू शकतं, असं अमृता राव म्हणाली.

सगळ्यांसमोर स्तनपान करण्याला आपल्याकडे आजही विरोध असल्याचं किवा विचित्र नजरेने पाहिलं जात असल्याचं जाणून मी निराश झाले. नशिबाने मी ज्या कुटुंबात आहे तिथे या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आम्हाला वाटतं स्तनपान एक सामान्य गोष्ट आहे. माझ्या सासरकडेचे खास करून माझ्य सासूला याचं पूर्ण श्रेय जातं. मी माझ्या मुलाला स्तनपानासाठी दुसऱ्या खोलीत नेण्याची गरज नाही असं त्या ठासून सांगतात. त्याऐवजी प्रत्येकासारख्याच मी सहज वागावं असं त्या म्हणतात. हे कौतुकास्पद असल्याचं अमृताने म्हटलं आहे.

दरम्यान, मला आनंद आहे की अनमोलने तो फोटो शेअर केला. त्याने तो मुद्दाम पोस्ट केला नाही. आमच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी त्याने तो शेअर केला. जर स्तनपान ही गोष्टी अगदी सामान्य केली तर खूप बरं होईल, असं अमृता म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by RJ Anmol 🇮🇳 (@rjanmol27)

थोडक्यात बातम्या-

“गडकरींकडे जबाबदारी देण्याचा सल्ला मानला असता तर कोरोना नियंत्रणात असता”

“राऊत कोणाच्या सांगण्यावरून भाजपवर टीका करतात, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो”

‘कोरोना काळात राजकारण करू नका, पक्ष विसरून मदत करा’; गडकरींनी टोचले भाजप कार्यकर्त्यांचे कान

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन आणखी वाढवला

मालदीवमध्ये दारु पिऊन वॅार्नर आणि स्टेलर यांच्यात जोरदार हाणामारी?, स्टेलरनं दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More