नागपूर | हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटनेवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आपल्यातलं भांडण विसरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी कठोर निर्णय घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हिंगणघाट आणि औरंगाबाद येथे महिलांना जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यात 4 acid attack च्या दुर्देवी घटना घडलेल्या आहेत! हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसरला जाळण्याचा प्रयत्न, औरंगाबादमधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो! आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहेत, असं त्या म्हणाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ साठी असलेल्या योजनेतील सवलती पीडितेला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भरण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जमिनीवर येऊन पूर्ण करा, असंही अमृता म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यात ४ acid attack च्य दुर्देवी घटना घडलेल्या अहेत!नागपुर मधे हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिता ला जाळण्याचा प्रयत्न,औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो!आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक @OfficeofUT
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2020
देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा @OfficeofUT
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
पवारांमुळं, ‘भूखंडाचं श्रीखंड’ शब्द महाराष्ट्राला मिळाला- माधव भंडारी
“बच्चू कडू…तुमच्यासारखा वाघ शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसची बेरोजगारी कधीच संपू देणार नाही- पंतप्रधान मोदी
फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रालाच फायदा होईल- एकनाथ खडसे
महात्मा गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असतील, आमच्यासाठी जीवन- नरेंद्र मोदी
Comments are closed.