बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीसांवरील टीकेला मिसेस फडणवीसांचं उत्तर; आदित्य ठाकरेंना म्हणाल्या ‘रेशमी कीडा’

मुंबई | बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. या वादात आता अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट करुन आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.

रेशमी किड्याला आयुष्यातील उपहास समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन रेशमी आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होत असते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिनान वाटतो, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही असं म्हणत त्यांनी टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं.

देवेंद्र फडणवीसजी मी सहसा प्रत्युत्तर देत नाही. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही, असं आदित्य यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट आहे; सोनिया गांधींचा गंभीर आरोप

दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा- सोनिया गांधी

महत्वाच्या बातम्या-

बाहुबली फेम भल्लालदेवने नव्या चित्रपटासाठी घटवलं तब्बल इतके किलो वजन

सावरकरांना भारतरत्न मिळावं म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करूया- अजित पवार

“शिवसेनेला अडचणीत आणण्याची भाजपमध्ये ताकद नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More