बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही- अमृता फडणवीस

पुणे | राज्याच्या राज्यपालांनी तीन जिल्ह्यांच्या दौरा केला होता. यावरून राजकारण तापलेलं दिसत आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर टीका केली होती. यावरून भाजप नेत्यांनी राज्यपालांच्या दौऱ्याचं समर्थन करत सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. अशातच यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा असून, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील. हा त्यांच्या मनात राग असेल त्याबद्दल मला माहिती नाही. पण असे व्हायला नको, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

अमृता फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी युतीबद्दल आणि पुण्यातील लोकांना नियम पाळा आणि खरेदी करा करा असा सल्ला दिला. भाजप कोणाशी युती करणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

दरम्यान, 4 टक्के पाॅझिटीव्हीटी दर असताना पुणे का सुरू झालं नाही, हे मला समजत नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती, 18 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत!

रौप्य पदक मिळवत इतिहास रचणाऱ्या रवीकुमार दहियावर बक्षिसांचा वर्षाव; 4 कोटी, गावात स्टेडियम अन्…

‘हा’ पॅक त्वचेला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा!

सुवर्ण पदक हुकलं पण भारतीयांचं ह्रदय जिंकलंस! अंतिम लढतीत रवीकुमार दहियाचा पराभव

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More