मुंबई | राज्यातील विधान परिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये भाजपला अनपेक्षित असा निकाल लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
भाजपने आपला बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि पुणे हे दोन्ही हक्काचे मतदारसंघ गमावले आहेत. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, ” वाईट सुरुवात झाली तर त्याचा शेवट हा चांगलाच होतो.”
भाजपला सहा जागांपैकी एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “हिंमत असेल तर एकटे लढून दाखवा.” पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले पाटील हे नेहमीच विनोदी वक्तव्य करत असतात. ते कसे आमदार झाले आहेत हे त्यांनाही माहित आहे.”
दरम्यान, भाजपला या निवडणुकीत जरी अपेक्षेप्रमाणे यश मिळाला नसलं तरी आता मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर भाजपचं लक्ष असणार आहे.
This bad beginning will surely lead to a good ending ! #JaiMaharashtra @BJP4Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
उर्मिला मातोंडकरांचा आनंद गगनात मावेना; पाहा काय केलंय ट्विट!
कोरोना लसीची किंमत किती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
‘मी विनोदी आहे की नाही ते जनता ठरवेल’, चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”
“…म्हणून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव झाला”
Comments are closed.