Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो त्यांच्याकडे नेहमी…- अमृता फडणवीस

मुंबई | महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांचा आज 80वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राज्यासह देशातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या येत आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांच्याकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो. त्यांच्याकडे नेहमीच ‘आय एम पॉझिसिबल’ हा शब्द असतो. हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कितीही खाली गेलो तरी वर उसळून यायची हिंमत आणि इच्छा असायला पाहिजे. त्यासाठी वय, जात याचा काहीही संबंध नसतो, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. दिविज फाऊंडेशनमार्फत अमृता यांनी रक्तदान केलं त्यावेळी त्या बोलल्या.

दरम्यान, शरद पवारांनी महाराष्ट्रासह देशासाठी खूप काम केलं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या.

थोडक्यात बातम्या-

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

‘देवेंद्र.. जीवनात मोठं व्हायचं असेल तर…’; फडणवीसांनी सांगितला मुंडेंनी दिलेला कानमंत्र

शेतकऱ्यांनो कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

धक्कादायक!; पुण्यातील भाजप आमदाराच्या घरात मोठी चोरी, इतक्या लाखाचे दागिने लंपास

पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…; भाजपचा शिवसेनेला टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या