Top News महाराष्ट्र मुंबई

‘मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला’; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली तर भाजप नेत्यांनी कौतुक केलं. पण दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ट्रोल झाल्या आहेत.

अमृता फडणवीस अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना ट्विट करत म्हणाल्या की, मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आलं नाही अशापद्धतीने अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकतील.

अमृता यांच्या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षच झाली आहेत त्यामुळे पण अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये 100 वर्षात पाहिला नाही, असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, आपण नक्की भारतीय आहात का..? आपल्या ह्या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो.. भारत स्वतंत्र होऊन 73 वर्ष झाली आणि ह्यांनी 100 वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत, असं अनुज अर्चना एकनाथ गायकवाड नावाच्या नेटकऱ्याने म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-  

….तोपर्यंत आमीर खान मोबाईल ठेवणार बंद, आमिरने घेतला मोठा निर्णय!

“डॉ. तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला होता”

“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये”

“मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले”

“कुठलाही संकल्प नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसं म्हणायचं?”

“कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे यावरून अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या