महाराष्ट्र मुंबई

अर्णब गोस्वामी ‘उसूलों पे चला होगा’- अमृता फडणवीस

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रिपब्लिक टीव्हीने अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अमृता फडणवीसांनी रिट्विट केला आहे. तसेच बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा, असं म्हणत अमृता फडणवीसांनी अर्णब गोस्वामींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अर्णबची पाठराखण करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान. देशातील आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अर्णबच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू- चंद्रकांत पाटील

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल”

“अर्णब आमचा पोपट नाही, आम्ही पोपट वगैरे पाळत नाही”

“सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचं नाव, तरीही कारवाई का झाली नाही?”

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या