बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नेकी कर दरिया में डाल’ हा देवेंद्र फडणवीस यांचा चांगला गुण- अमृता फडणवीस

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना एक सल्ला दिला आहे. ‘नेकी कर दरिया में डाल’, हा देवेंद्र फडणवीस यांचा चांगला गुण आहे. पण, दान हे सत्पात्रीच असावं. काही वेळा जिथे चांगुलपणा दाखवायला नको, तिथेही ते दाखवतात. त्यांनी असं करायला नको, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी लवकरच महाराष्ट्राचे खरे प्रमुख होण्याचा प्रयत्न करावा, अशी टीकाही अमृता फडणवीसांनी केलीये. त्या  ‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

स्त्री-समानतेचा विचार लहानपणापासून मनात रुजला होता. जडणघडणही तशीच झाली. मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जशी आहे तशीच राहणार. ढोंगीपणा मला जमत नाही. मी जी मतं मांडते, ती माझी मतं असतात. मला ट्रोल करणाऱ्यांची दया येते. देव त्यांना सद‌्बुध्दी देवो, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, सायन्स चांगलं होतं, पण डॉक्टरकी हा काही आपला प्रांत नाही, हे लक्षात आलं होतं. त्यामुळे कॉमर्स निवडलं. त्याचा फायदा म्हणजे, मला गाण्याकडे आणि टेनिसकडेही लक्ष देता आलं. त्यानंतर, ॲक्सिस बँकेत नोकरी लागली, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांवरील कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी रुग्णालयात दाखल

पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही- योगी आदित्यनाथ

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More