“महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत”
नागपूर | आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी (Mahatma Gadhi) हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे.
अमृता फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केली आहे. अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.
नागपूर येथे पार पडलेल्या अभिरुप न्यायालयातील एका सवालाचा जवाब देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी त्यांनी मंगळसूत्रं आणि भिडे गुरुजी यावरही भाष्य केलं. मला भिडे गुरुजींचा प्रचंड आदर आहे. आजच्या काळात खूप गोष्टी बदलल्या आहेत. मंगळसूत्र हातात घातले तर देवेन्द्रजी माझा हात पकडतात असं वाटतं, असं त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.