बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्र वसूली संस्कार’; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई | 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली व महाविकास आघाडी हे नवं समीकरण सत्तेत आलं. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. सत्तेत आल्यापासूनच विरोधकाच्या निशाण्यावर असलेल्या या आघाडी सरकारने नुकतीच सत्तेतील दोन वर्ष पूर्ण केली.

तीन पायांचं सरकार म्हणत राज्यातील विरोधी पक्ष भाजपने या सरकारवर वेळोवेळी हल्लाबोल केला. याच महाविकास आघाडी सरकारने रविवारी सत्तेची दोन वर्षे पूर्ण केली. सरकारने दोन वर्षे पुर्ण करताच महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. या आरोप-प्रत्यारोपादरम्यान अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

आकस्मित आणि अनुपस्थितीत मुख्यमंत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र वसूली संस्कारचं दुसरं वर्ष, असा टोलाही अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाअयशस्वी होण्याची दोन वर्ष असा हॅशटॅगही वापरला आहे. (Amruta Fadnavis Criticises Uddhav Thackeray)

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Goverment) निशाणा साधला पण काही वेळाने हे ट्वीट डिलीट केलं. तर भाजपच्या इतर नेत्यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लॉकडाऊन नको असेल तर…’, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

‘कुछ नही होता यार’ आता अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची घंटा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी जाणून घ्या एका क्लिकवर

“वीज कनेक्शन तोडले, गावची गावे अंधारात जात आहेत आणि तुम्ही लग्नात नाचता?”

“…पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही, 2 वर्षात राज्य 20 वर्षे मागे गेलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More