बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं, तुमचं लक्ष कुठे असतं?- अमृता फडणवीस

मुंबई | मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने तर सर्वच हद्द पार केल्यात. एका 15 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्य हादरुन गेलं आहे. या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. त्या लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

मागील दोन महिन्यांपासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यावर साम, दाम, दंड , भेद अशा कुठल्याही प्रकारे तडा आणता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे आहे?, असा सवाल अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

तुम्ही टक्केवारी दाखवू नका. 2 महिने लक्ष कुठे आहे? आपल्या माणसांना वसुली मिळतेय त्यावर लक्ष आहे का?, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान, कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्यानं घरातील कर्त्या व्यक्तीला पत्र पाठवलं तर तो कर्ता पुरुष दुसऱ्या कुटुंबात काय चाललंय हे सांगतात. तुम्ही अन्य दहा कुटुंबाबाबत का बोलता? असा सवाल करतानाच शक्ती कायद्यासाठी 2 दिवसांचं विशेष अधिवेशन गरजेचं असल्याचं मत अमृता फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More