Anant-Radhika Sangeet Ceremony | अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाहसोहळा येत्या 12 जुलै रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली असून बुधवारी मामेरू कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यात बॉलीवुडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
तसेच काही राजकीय कुटुंबातील व्यक्तींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुलीसह अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला पोहोचल्या.
अमृता फडणवीस अन् लेक दिविजा यांचा खास लुक
सोशल मीडियावर सध्या अमृता फडणवीस आणि दिविजा (Anant-Radhika Sangeet Ceremony) यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस यांनी हिरव्या रंगाचा लेहेंगा घातलाय. तर लेक दिविजा हिने काळ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. दोघींनी जवळपास सारखेच ड्रेस घातले होते व लूकही सारखाच केला होता. त्यांच्या या लुकने सोहळ्यात सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. संगीतमध्ये हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बिबर याने परफॉर्म केलं. यासह अनेक बॉलीवूड स्टार्सही मंचावर थिरकले.
View this post on Instagram
‘या’ तारखेला अनंत-राधिका करणार लग्न
सोहळ्यात जस्टिन बिबर याने परफॉर्म करण्यासाठी तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 83 कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 तारखेला लग्न बंधनात अडकणार आहेत.
अनंत आणि राधिका (Anant-Radhika Sangeet Ceremony) यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी 3 वाजता असून लग्नाचे फेरे अँटिलिया येथे होणार आहेत. यानंतर 13 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. मग 14 जुलै रोजी रिसेप्शन आयोजित केले जानर आहे. या सोहळ्यात देखील फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज लोकांना आमंत्रित करण्यात येईल.
News Title – Amruta Fadnavis look in Anant-Radhika Sangeet Ceremony
महत्वाच्या बातम्या-
“आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी”; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबईकरांनो ‘या’ कारणामुळे मुंबईतील ‘हे’ रस्ते 4 दिवस बंद राहणार; असा असणार पर्यायी मार्ग
मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सुरवात; असा असणार रॅलीचा मार्ग
पुण्यात रात्री घडला धक्कादायक प्रकार; महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं..पुढं काय घडलं
ब्रेकिंग! खासदार रविंद्र वायकरांना क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे