बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना वाॅरिअर्ससाठी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं

मुंबई | कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या माध्यमातून या सर्वांचे आभार मानले आहेत.

‘तू मंदिर, तू शिवाला’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. अमृता फडणवीसांचं हे गाणं सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अमृता फडणवीस यांची गाणी नेहमीच रसिकांचं लक्ष वेधून घेतात. याआधी सलमान खान, अजय देवगण या सेलिब्रिटींनीसुद्धा कोरोनावर गाणी प्रदर्शित केली आहेत.

दरम्यान, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करणाऱ्या योद्धांसाठी अमृता फडणवीसांनी हे गाणं समर्पित केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

‘…म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही’; कमलनाथांनी केला मोठा खुलासा

महत्वाच्या बातम्या-

“आमच्या नाकाखाली काय सुरू होतं ते उशिरा समजलं”

राज्यात आज 790 कोरोनाचे नवे रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती

“ट्रोलिंग थांबवा अन्यथा भाजप कार्यकर्ते जशाच तसं उत्तर देतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More