बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीसांचं ‘तांडव’, नवं गाणं होतंय तुफान व्हायरल

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता फडणवीस त्यांच्या अनोख्या गायनशैलीमुळे लोकप्रिय आहेत. अमृता फडणवीसांचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीसांच्या आवाजातील शिवतांडव स्तोत्र प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर काही तासातच व्हिडीओने 3 मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.

जेव्हा तुम्हाला जग जिंकण्यासाठी उर्जेची गरज असते. तुमच्या आत्म्याला बरे करण्यासठी, बळकट करण्यासाठी आणि शुद्द करण्यासाठीचे हे गाणे. सर्व शिवभक्तांसाठी भक्ती, देवत्व, अध्यात्म यांचे परम गीत, असं म्हणत अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केलं आहे.

दरम्यान, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. तर शैलेश दाणी यांनी हे शिवतांडव स्तोत्र संगीतबद्द केेलं आहे. व्हिडीओ प्रदर्शित होताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी अमृता फडणवीसांच्या गायनशैलीचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष पुतीनला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

“या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून…”

 “ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”

“आघाडी सरकारमधील नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावतील”

युक्रेनच्या ‘या’ अभिनेत्रीच्या पाठीवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More