Amruta Fadnavis | महाराष्ट्रात अखेर देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. 05 डिसेंबर राजी तिनही नेत्यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शपथ घेतली आहे. मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्यातील मंत्र्यांनी, बाॅलिवूडमधील कलाकरांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फडणवीसांच्या पहिल्या निर्णयावर भाष्य केलं आहे.
फडणवीसांचा पहिला निर्णय कोणता?
माध्यमांशी बोलत असताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देवेंद्र फडणवीस पहिला कोणता निर्णय घेणार आहे, याबद्दल स्पष्टच बोलल्या. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पहिला निर्णय लोकहिताचा असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या की, त्यांच्याविरोधात नॅरेटिव्ह केले तरी जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या पाठीशी जनता उभी राहिली याचा खूप आनंद असल्याचं त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली-
एवढंच नाही तर, अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी फडणवीस यांच्यावर सतत होत असलेल्या टीकांवर देखील भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. टिप्पणी झाली. पण त्यांचे अर्जुनासारखं एकच लक्ष्य होतं. त्यांनी जनतेच्या विश्वासाचं कामातून चीज करून दाखवलं. त्यांना गादीसाठी पुन्हा यायचं नव्हतं. तर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचं होतं, असे मत अमृता फडणवीस यांनी मांडलं.
याशिवाय अमृता फडणवीस यांनी लाडक्या बहिणींने महायुतीवर दाखवलेल्या प्रेमाबद्दल वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेने मोठी कमाल केल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारा दरम्यान अनेक ठिकाणी जावे लागले. अनेक भागात आपण प्रचारासाठी गेलो. त्यावेळी लाडक्या बहिणींचे महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील प्रेम दिसले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
News Title : amruta fadnavis on devendra fadnavis
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादांचा नवा विक्रम! पुन्हा एकदा ‘उपमुख्यमंत्री’ पदावर विराजमान
“मी एकनाथ संभाजीराव शिंदे शपथ घेतो की…”; एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!
‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की…’; महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व
‘महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ