बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला रिमेक

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट करत सस्पेन्स निर्माण केला होता. ‘आज कुछ तूफानी करते है, मी पुन्हा येत आहे,’ असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या ट्विटनंतर काही तासांतच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर सध्या लाईक्सचा वर्षाव होत आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मनिके मागे हिते’ या गाण्याने सगळीकडेच धुमाकुळ घातला होता. काही काळातच या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तर अमृता फडणवीस मनिके मागे हिते या हिट गाण्याचा रिमेक घेऊन आल्या आहेत. आतापर्यंत अमृता फडणवीस यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता अमृता फडणवीस मनिके मागे हिते या हिट गाण्याचं भन्नाट व्हर्जन घेऊन आल्या आहेत.

‘सध्या सुरू असलेल्या तापदायक राजकीय वातावरणात या कूल गाण्याने थोडं चिल पील घ्या,’ असं कॅप्शन देत अमृता फडणवीस यांनी हे गाणं शेअर केलं आहे. तर योहानीने 22 मे रोजी मनिके मागे हिते गाणं शेअर केलं होतं. श्रीलंकेसह भारतातही या गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तर याच गाण्यातून प्रेरणा घेत अमृता फडणवीस यांनी या गाण्याचा रिमेक केला आहे. या रिमेक गाण्यात अमृता फडणवीस हटके लूकमध्ये दिसत आहेत.

अनेक काळ मिसेस मुख्यमंत्री अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आवाजाने रसिकांच्या मनात जागा निर्माण करत गायिका म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अनेक राजकीय विषयात अमृता फडणवीस प्रतिक्रिया देत असतात. अनेक नेत्यांसोबत त्यांचा शाब्दिक वाद रंगताना पाहायला मिळाला आहे. तर अमृता फडणवीस त्यांच्या नव्या गाण्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच धुमाकुळ घालत आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या-

Mr 360 चं वर्तुळ पुर्ण; महान खेळाडू एबी डिव्हिलीयर्सची क्रिकेटमधून निवृत्ती

“अन्नदात्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणल्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागावी”

‘मुंबईतील ते बार समीर वानखेडेंच्या मालकीचं?’; नवाब मलिकांच्या नव्या दाव्याने खळबळ

“लज्जास्पद, दु:खद आणि पुर्णपणे अन्यायकारक निर्णय”

“वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More