मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे याठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं होतं.
किरीट सोमय्यांच्या या ट्विटला अमृता फडणवीस यांनी यांनी रिट्विट करत त्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
So the so called ‘environment’ loving family builds bungalow in forest land ? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाड़ी से करे निसर्ग पर वार !! #mahavikrutaghadi https://t.co/SNk8pNWoko
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 25, 2021
थोडक्यात बातम्या-
अभिनंदन!!! महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर
घेतलं बरं का मिटवून…. त्या चिमुकल्यांच्या भांडणाचा अखेर गोड शेवट, पाहा व्हिडीओ-
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शनमध्ये; ‘या’ चॅनेलवर केली मोठी कारवाई
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या 57 शूर पोलिसांना पदक जाहीर