मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. कोरोना व्हायरस आणि पेंग्विन महासरकार व्हायरस कधी, केव्हा आणि कसे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेईल, हे काही सांगता येत नाही, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समित ठक्कर या तरुणाला शनिवारी अटक केली आहे. आनंद रंगनाथन यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महासरकार व्हायरसची उपमा दिली आहे.
क्वारंटाइन होण्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलंय.
याआधीही अनेकदा अमृता फडणवीस यांनी राज्यातील महाविकास राज्य सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचं आहे”
…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजयपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे
‘या’ अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सामील झालो- एकनाथ खडसे
पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी- पंकजा मुंडे
ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगणाचं संजय राऊतांवर टीकास्त्र; म्हणाली…
Comments are closed.