महाराष्ट्र मुंबई

‘दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?’; अमृता फडणवीस आणि प्रियांका चर्तुर्वेदींमध्ये जुंपली

मुंबई | मुंबई पोलिसांची पगार खाती ‘अ‍ॅक्सिस बँके‘तून ‘एचडीएफसी’मध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मनमानी करुन ज्या पद्धतीने बँकेची निवड करत राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराची खाती रातोरात हलवण्यात आली होती, हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यकच होता, असं ट्विट शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केलं. यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रियांका चतुर्वेदींना प्रत्युत्तर दिलंय.

अ‍ॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही, ही खाजगी क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून त्याच बँकेसाठी 18 वर्ष काम केले आहे, असं अमृता फडवीसांनी सांगितलं.

संधीसाधू दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील?, असं म्हणत अमृता फडणवीसांनी प्रियांका चतुर्वेदींवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

दरम्यान, ही खाती 2005 आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार प्राप्त झाली होती, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! भारत बायोटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकच चाचणीला होणार सुरुवात

“वादा तेरा वादा” म्हणत ‘या’ दिग्दर्शकाने मोदी सरकारची उडवली खिल्ली

एकनाथ खडसेंसोबत पुण्यातील ‘हा’ प्रसिद्ध व्यक्तीही करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या