मुंबई | मुंबई परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर टीका केली आहे.
सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर लोकच सत्तेला भ्रष्ट करतात, अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.
मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह काल अचानकपणे खंडित झाला. लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता.
महत्वाच्या बातम्या-
खोट्या टेस्टिंग किट्स देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार- आरोग्यमंत्री
लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी
…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले
‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं