‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई | महाराष्ट्रात कोरोना लसीच्या तुटवड्यावरुन राजकारण तापलं आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल एवढात लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला प्रत्युत्तर दिलं. आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?, असा सवाल करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान, व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?, असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे.
पहचान कौन?
एक राजा जो-
महल की चौखट से निकलता नही
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही !सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 8, 2021
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!
अखेर कोब्रा कमांडोला नक्षलवाद्यांनी सोडलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खुशखबर; उबर कंपनी देणार फ्रि राईड
रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे उत्पादक कंपन्यांना ‘हे’ महत्वाचे आदेश
कोरोनाची लस घेण्याआधी ‘या’ 5 गोष्टी आवर्जून टाळा; डॉक्टरांच्या महत्त्वाच्या सूचना
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.