बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा लोक मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात- अमृता फडणवीस

मुंबई | जेव्हा माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा काही लोकं मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्या लोकमतशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मी एका भाजप नेत्याची पत्नी आहे, म्हणून मी काहीही केलं किंवा म्हटलं. तर, या लोकांना वाटतं की, मी तेथून प्रेरणा घेऊनच हे करत आहे. पण, माझ्या ट्विटरवरील ज्या कमेंट असतात, त्या माझ्या विचारानुसार, मला वाटलं की असं लोकांपुढे म्हणायचं आहे, तर ते ट्विट केललं असतं, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे.

माझा भाजपकडे कल आहे, किंवा मी देवेंद्र फडणवीसांची पत्नी आहे, म्हणून ते लिहित नाही, असं अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितलं. तसेच गाणं ही माझी फॅशन आहे, त्यामुळे मी गाणं करत असते, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. भक्ती म्हणजे सेवा हा संदेश त्यांनी या गाण्यातून दिलाय. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

छोट्या कियाराचा सोशल मीडियात धुमाकूळ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मोठी बातमी! किंग कोहली कर्णधारपदावरून होणार पायउतार?, ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयची नजर

“भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मला पैशांची ऑफर दिली होती, पण मी पैसे न घेता पक्षात आलो”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More