‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक!

मुंबई | पिहू सिनेमातील मायरा विश्वकर्माचं सगळ्याच स्तरातून कौतुक केलं जातं आहे. मायराच्या अभिनयाचं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

हा सिनेमा पाहताना अंगावर शहारे येतात. मायराने या चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अमृता फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मायराचं कौतुक केलं.

दरम्यान, पिहू या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. मायरानं या चित्रपटात जबरदस्त अभिनय केलेला आहे, असं एकंदरीत ट्रेलरवरून समजतंय. त्यामुळे हा चित्रपट नेमका कधी रिलीज होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?

-ही ‘समृद्धी’ कुणाची?; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद