“प्लॅस्टिक सर्जरी ही फार महागडी गोष्ट, लग्नापूर्वी मी एकदाही ब्यूटी पार्लरला गेले नव्हते”
मुंबई | झी मराठीवर(Zee Marathi) नव्याने भेटीला आलेला ‘बस बाई बस'(Bus Bai Bus) हा शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. सुबोध भावे(Subodh Bhave) या कार्यक्रमाचे होस्ट आहेत. या कार्यक्रमात सुबोध भावे लेडीज स्पेशल बस घेऊन येत असतात. या कार्यक्रमच्या तिसऱ्या भागात ही बस सुबोध भावेंनी एका खास व्यक्तीसाठी थांबवली, ती व्यक्ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis).
या भागात महिलामंडळाने विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे अमृता फडणवीस यांनी दिली. अमृता फडणवीसांना, तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातले नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का?, असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्या म्हणाल्या, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे, ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला की काय असं वाटतं, म्हणून मंगळसूत्र मी हातात घालते, त्यामुळे देवेंद्रजींनी माझा हात पकडला आहे असं वाटत.
तसेच शो दरम्यान, प्लॅस्टिक सर्जरी केली आहे का?, असा प्रश्नही अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या बरं झालं हा प्रश्न विचारण्यात आला, मला यावरून सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. प्लॅस्टिक सर्जरी ही फार महागडी गोष्ट आहे. त्यात धोकाही आहे. मी लग्नापूर्वी एकदाही ब्यूटी पार्लरला गेले नव्हते. देवेंद्रजींना माझा चेहरा महत्वाचा नाही. ते स्रीचा चेहरा नाही तर मन पाहतात, यावर सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
दरम्यान, 29 जुलैला ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुबोध भावेंनी ‘तुला पाहते रे’ या मालिकेनंतर तीन वर्षांनी या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर
शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार
संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; ईडीच्या तपासात महत्त्वाची समोर
‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’, पडळकरांची टोलेबाजी
…अन् उर्फीने कपड्यांऐवजी चक्क गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ
Comments are closed.