Amruta Pande | भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेनी आयुष्य संपवल्याने भोजपुरी चित्रपटसृष्टी हदरली आहे. अमृता पांडेच्या निधनाची माहिती सोमर आल्यावर सगळीकडे एकच खळबळ उडाली. अमृताच्या चाहत्यांना देखील बातमी समोर आल्यावर धक्का बसला. सोशल मीडियावर अमृताची जबरदस्त फॅन फॉलोइंग होती. अमृताचा मृतदेह भागलपूरमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. तसेच मृत्यूपूर्वी तिने व्हॉट्सॲपवर एक संशयास्पद स्टेट्स ठेवलं होतं. आणि काही वेळातच तिच्या मृत्यूची बातमी समोर आली.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनूसार, भागलपूरमधील जोगसार पोलीस स्टेशन हद्दीतील दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये , (27 एप्रिल) रोजी संध्याकाळच्या सुमारास अमृताचा (Amruta Pande) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचं समोर आलं. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी पोहोचले.
पोलिस या गोष्टींचा तपास करत असताना अभिनेत्रीनं (Amruta Pande) गळफास घेतल्याचा अंदाज बांधला जात आहे. अमृता पांडेने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे.
व्हाॅट्सअपवर स्टेट्स –
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनूसार, मृत्यूपूर्वी भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘त्याचं आयुष्य दोन बोटींवर स्वार आहे, मी माझं आयुष्य संपवत त्याचा मार्ग मोकळा केला.’ असं तिने लिहिलं होतं. त्यामुळं अमृतासोबत नक्की काय घडलं याचा तपास पोलीस करत आहेत.
अमृता चिंतेत होती-
अमृताने टोकाचं पाऊल उचल्यामुळे तिच्या कुटुंबांना देखील धक्का बसला आहे. 2022 मध्ये बिलासपूर, छत्तीसगड येथील चंद्रमणी झांगडशी ती लग्नबंधनात अडकली होती. तिचा नवरा मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर आहे. आजपर्यंत त्यांना मुलबाळ नाही. अमृताच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, अमृता तिच्या करिअरबद्दल खूप चिंतेत होती. ती खूप उदास होती. याच कारणामुळे तिच्यावर उपचारही सुरू होते.
News Title : Amruta Pandey finished her life
महत्त्वाची बातम्या-
कशाला करतो गॅरंटीची बात!, रॅपच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल
‘आधी अजितदादांनी हे सांगावं’; रोहित पवारांचं थेट अजित पवारांना चॅलेंज
इथे मिळतंय मोफत पेट्रोल! मतदान करा अन् ‘इतक्या’ रुपयांचं पेट्रोल मोफत मिळवा