बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सॅमसंगने ‘ती’ ऑफर 17 मेपर्यंत वाढवली; एसी, फ्रिज-टीव्हीवर मिळणार कॅशबॅक

मुंबई | सॅमसंग कंपनीने त्यांची ‘Stay Home, Stay Happy’ ही ऑफर 17 मे पर्यंत वाढवली आहे. ग्राहकांकडून वाढत्या मागणीमुळे गेल्या आठवड्यात आणलेली ही ऑफर कंपनीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाउनमध्ये ज्यांना टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन किंवा अन्य उपकरण खरेदी करायचं असेल अशा ग्राहकांसाठी कंपनीने ही प्री-बूकिंग ऑफर गेल्या आठवड्यात आणली होती. ती आता 17 मेपर्यंत असणार आहे. सॅमसंग कंपनी Stay Home, Stay Happy या ऑफरअंतर्गत आपल्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर कॅशबॅक देत आहे.

युजर सॅमसंगच्या ऑनलाइन इ-शॉपमधून (https://www.samsung.com/in/offer/online/ce-sale/) प्रोडक्ट्स प्री-बूक करु शकतात. बूक केलेल्या कोणत्याही प्रोडक्टवर ग्राहकांना 15 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. पण, ही ऑफर केवळ एचडीएफसीच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरच आहे. मात्र, याव्यतिरिक्तही कंपनीच्या अनेक ऑफर आहेत.

सॅमसंग टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्ष अतिरिक्त वॉरंटी आणि 30 दिवस ZEE5 प्रीमियमची मोफत मेंबरशीप मिळेल. याशिवाय ओव्हन आणि अन्य प्रोडक्ट्सवरही आकर्षक सूट आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!

महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम- सुभाष देसाई

महत्वाच्या बातम्या-

राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

कसाबच्या साक्षीदाराचा उपचारखर्च भाजप उचलणार; फडणवीसांकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

“चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More