सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ

Milk Price Hike l लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान देशातील जनता महागाईने होरपळली आहे. अमूल दुधाच्या विविध प्रकारांच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुधाचे वाढलेले दर सोमवार 3 जून रोजी म्हणजेच आज सकाळपासून लागू होणार आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना दूध खरेदी करण्यासाठी 2 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

कोणत्या ब्रँडच्या किमती किती वाढल्या?

अमूलने गोल्डसह सर्व ब्रँडच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने सोमवार, 3 जूनपासून नवीन दुधाचे दर लागू करण्याची घोषणा केली आहे. अमूलनंतर मदर डेअरी आणि इतर कंपन्याही दुधाचे दर वाढवू शकतात. नव्या किमतींनंतर अमूल गोल्डच्या एक लिटर दुधाच्या पिशवीला 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आता एक लिटर अमूल गोल्ड दुधासाठी तुम्हाला 66 रुपये मोजावे लागणार आहेत.

गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने वाढीव भाव जाहीर केले आहेत. 2 रुपये प्रति लिटर वाढ म्हणजे एमआरपी 3-4% वाढेल, जी सरासरी अन्न महागाईपेक्षा खूपच कमी आहे. अमूलने फेब्रुवारी 2023 पासून गुजरात वगळता देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ताज्या पाऊच दुधाच्या किमतीत वाढ केलेली नाही.

Milk Price Hike l भाव का वाढले? :

GCMMF चे म्हणणे आहे की, दुधाचे उत्पादन आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे दुधाचे दर वाढवले ​​जात आहेत. युनियन सदस्यांनीही गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या किमतीत सुमारे 6 ते 8 टक्क्यांनी वाढ केली आहे. धोरणांतर्गत, अमूल दूध उत्पादकांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांकडून भरलेल्या प्रत्येक रुपयाचे 80 पैसे देते.

कंपन्यांनी दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याने दूध उत्पादकांना नफा मिळणार आहे. याशिवाय अधिक दूध उत्पादनास प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. मात्र आजपासून सर्वसामान्य लोकांना अधिकचे 2 रुपये पाजावे लागणार आहेत.

News Title – Amul Milk Price Hike

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…नाहीतर मी स्वत:ला संपवून घेईन’; बजरंग सोनवणेंच्या वक्तव्याने खळबळ

कुठे ऊन, कुठे पाऊस; वाचा हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

राज्यातील एक्झिट पोलवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘अशा’ व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही; ‘या’ सवयी आजच बदला

‘नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर…’; रवी राणांच्या वक्तव्याने खळबळ