लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सर्वसामान्यांना मोठा झटका!

Amul Milk Prize | लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. निकालाला आता काही तास उरले आहेत. मात्र निकाल लागण्यापूर्वीच दुधाच्या किंमतीत वाढ झालेली माहिती आता समोर आली. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होण्याआधी दुधाच्या किंमतीत दरवाढ झाली आहे. (Amul Milk Prize)

गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून म्हणजेच 3 जूनपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. अमूल दूधाच्या किंमतीत एक लिटरमागे प्रत्येकी 2 रूपयांनी भाव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दोन रूपये अधिक मोजावे लागणार आहे. (Amul Milk Prize)

अमूलच्या दुधात दरवाढ

अमूव गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती या तिन्ही कंपन्यांच्या दरामध्ये ही वाढ होणार आहे. तिन्ही कंपन्यांच्या दूधाच्या किंमतीमध्ये भाववाढ झाली. अमूलच्या छोट्या पिशव्यांच्या किंमतीमध्ये कोणतीही अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजे छोट्या पिशव्यांमधील दूध आहे. त्या किंमतीमध्ये मिळणार आहे. अमूलने दुधाच्या दरातील वाढ ही फक्त एका राज्यासाठी नाहीतर संपूर्ण देशभरात केली आहे. (Amul Milk Prize)

अमूल दुधाच्या किंमतीत किती दराने झाली वाढ?

अमूल दुधाच्या किंमतीनुसार अमूल गोल्ड अर्धा लिटर दूध हे 32 रूपये किंमतीवरून 33 रूपये, अमूल ताज 500 मिलीची किंमत 26 रुपयांवरून 27, मूल शक्ती 500 मिली आता 29 रुपयांवरून 30 रूपये इतकी झाली आहे. एक लिटर दुधासाठी लोकांना आता 66 रुपये द्यावे लागणार आहेत. जे निवडणुकीआधी 64 रूपये होते. दुधाच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. याचाच अर्थ आता सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने फेब्रुवारी महिन्यात 2023 मध्ये केली होती. शेतकऱ्यांना उत्पदनासाठी वाढलेला खर्च भरून निघावा यासाठी ही वाढ करण्यात आली असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. (Amul Milk Prize)

News Title – Amul Milk Prize Increase News Update

महत्त्वाच्या बातम्या

…म्हणून जालन्यात महाविकास आघाडी बाजी मारणार?

प्रवास करणे महागले; टोल टॅक्सच्या किंमती तब्ब्ल ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार

सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका, दुधाच्या किंमतीत वाढ

आज या राशीच्या राजकीय व्यक्तींना जनतेचा पाठिंबा असल्याचं दिसून येईल