बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

18 वर्षीय मुलीनं बाप झोपेत असतानाच त्याचा गळा आवळला; ‘हे’ ठरलं कारण!

लखनऊ | बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रविवारी सकाळी उत्तराखंडमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये एका 18 वर्षाच्या तरुणीने तिच्या प्रियकरासोबत आपल्याच वडिलांची हत्त्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. खून झालेल्या या व्यक्तीचं वय 52 वर्षे असून त्यांचं नाव दरबारी लाल रावत असं होतं.

दरबारी यांना एक 18 वर्षाची रेणू नावाची मुलगी असून या मुलीचं त्यांच्या शेजारच्या रवी नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध दरबारी यांना मंजूर नसल्याकारण रेणू आणि दरबारी यांमध्ये अनेकदा वाद होत होते. दरबारी यांनी त्यांच्या मुलीला रवी सोबतचे संबंध तोडण्यास सांगितले होते. मात्र रेणूने ते कायम ठेवले.

रविवारी सकाळी दरबारी यांची पत्नी सुनिता देवीने दरबारी यांना मृतवस्थेेत पाहताच पोलिसांना बोलावलं. त्यानंतर रेणू आणि रवीच्या नात्याला दरबारी यांचा विरोध असल्याचं तेथील लोकांनी आणि सुनिता देवींनी सांगितलं. यामुळे पोलिसांनी रेणूची चौकशी केली. यादरम्यान रेणूने तिच्यावर केलेला आरोप खोटा असल्याचं सांगितलं.

दरम्यान, रेणूची बराच वेळ चौकशी केल्यानंतर आपल्या प्रियकरासोबत मिळून रस्सीने गळा आवळून आपल्या वडिलांची हत्या केल्याचं रेणूने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी रेणू आणि रवीला ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी”; परमबीर सिंग अडचणीत

शरद पवारांनी नाव घेतलेले ज्युलिओ रिबेरो म्हणतात, “हे काम मी करणार नाही!”

“जो न्याय शिवसेनेच्या मंत्र्याला लावला तो न्याय राष्ट्रवादीच्या मंत्र्याला लावणार का?”

दीदी, हवं तर मला लाथा मारा पण…- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“चार कोंबड्या, दोन कावळे मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय आणि एनआयएला पाठवेल”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More