बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

बुलडाणा | बुलडाण्यात एक संतापजनक प्रकार घडलाय. संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात असलेल्या एका 8 वर्षाच्या मुलाकडून हाताने स्वछता गृह साफ करून घेण्यात आलं आहे. यामुळे परिसरात प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

परवा बुलढाणा जिल्हाधिकारी संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मारोड या गावात येतील या भीतीने पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या आदेशाने तात्काळ येथील विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्याचा आदेश देण्यात आला.

गावात कुणीही नसल्याने चक्क प्रशासनाने या बालकाला या विलगीकरण कक्षाच्या स्वछता गृहाची साफसफाई करण्यासाठी 50 रुपयांचं आमिष दाखवलं. बालकाने नकार दिल्यावर त्याला काठीने मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे बालकाने विलगीकरण कक्षात प्रवेश करून अक्षरशः हाताने टॉयलेट साफ केलं. यावेळी विलगिकरण कक्षात 15 कोरोना बाधित रुग्ण हजर होते.

मारोड येथील अशोभनीय घटनेबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील यांच्यासह दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. या पीडित मुलाला न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक भाऊ भोजने यांनी तामगाव पोलिसात बीडीओ आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; सरकारकडे केली ही महत्वाची मागणी

‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा’; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 3 महत्वाचे निर्णय; पाहा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More