बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी माझं आयुष्य जगलो म्हणत तरुणाला स्वत:चा बेड देणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाचं निधन

नागपूर | नागपूरमधून एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीने एका तरुण व्यक्तीसाठी आपलं जीवन पणाला लावलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले 85 वर्षीय नारायणराव दाभाडकर यांनी दाखवलेल्या उदारतेचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

सावित्री विहार, वर्धा रोड, नागपूर येथे राहणारे निवृत्त शासकिय कर्मचारी नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने काही दिवस वाट बघितल्यानंतर त्यांना नागपुरमधील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात बेड मिळाला.

रुग्णालयात दाखल होत असताना त्यांचं लक्ष रुग्णालयाच्या कोपऱ्यात रडणाऱ्या एका महिलेकडे गेलं. ती महिला तिच्या पतीला बेड मिळावा यासाठी हात जोडून विनवणी करत रडत होती. तिच्या पतीला ताबडतोब ऑक्सीजन बेडची गरज होती. त्यामुळे नारायण दाभाडकर यांनी आपला बेड त्या गरजू व्यक्तीला देण्याची विनंती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केली.

‘मी माझं जीवन जगलो आहे त्यामुळे माझा बेड या महिलेच्या पतीला उपलब्ध करून द्या, ती त्यांची आणि त्यांच्या परिवाराची गरज आहे’, असं त्यांनी बोलून दाखवलं आणि आपला बेड त्या रुग्णाला देण्याची विनंती केली. या निर्णयावर त्यांचे जावई आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची समजूत काढली. पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि बेड त्याच गरजू व्यक्तीला देण्याचा हट्ट धरला. रुग्णालयाने ही यासंबंधी हमीपत्रावर त्यांची स्वाक्षरी घेऊन त्यांना घरी जाऊ दिलं, त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात कोरोनामुळे नारायण दाभाडकर यांचं दुर्दैवी निधन झालं.

थोडक्यात बातम्या – 

कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला डाॅक्टरकडे केली शरीरसुखाची मागणी; आरोपीला अटक

बारावीच्या परीक्षांबाबत राज्य शासनाचा ‘हा’ मोठा निर्णय 

गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो, एकनाथ खडसेंच्या व्हायरल क्लिपने खळबळ

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं कोरोनामुळे निधन

पुण्यात थेट फेसबुकवरून दारूची विक्री; सापळा रचून आरोपीला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More