Kartik Aaryan | अभिनेता कार्तिक आर्यनला ‘ती’ गोष्ट पडली महागात; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Kartik Aaryan | ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. चाहत्यांच्या अति उत्साहामुळे कार्तिक (Kartik Aaryan) थोडक्यात वाचला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या कार्तिकचीच चर्चा होत आहे.

झाले असे की, ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024’ चा सोहळा पार पडला. यावेळी कार्तिकला बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीत मोठा अपघात होता होता टळला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. कार्तिक या व्हिडीओत इव्हेंटमध्ये पोहोचताना दिसला. मात्र, जेव्हा तो स्टेजच्या दिशेने जात होता तेव्हा एका व्यक्तीने त्याचा हात पकडत त्याला हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला.

कार्तिक आर्यनचा व्हिडीओ व्हायरल

याचवेळी त्या व्यक्तीचा हात सोडून कार्तिकने (Kartik Aaryan) तिथून निघण्याचा प्रयत्न केला. याच क्षणी चाहत्यांची गर्दीही कार्तिकच्या दिशेने वळू लागली. त्यांना रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड्सही त्यामुळे तुटून गेले. बॅरिकेड्स पडताच कार्तिक घाबरला आणि मागे सरकला. तो मागे सरकला नसता तर मोठी दुखापत होण्याची दाट शक्यता होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कार्तिकच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव दिसून आले. या घटनेनंतर त्याने चाहत्यांशी संवाद ही साधला. योग्यवेळी सावध झाल्याने कार्तिक थोडक्यात वाचला. अन्यथा होत्याचं नव्हतं झालं असतं. या व्हिडीओवर आता अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.

फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये झाला अपघात

दरम्यान, फिल्मफेअर अवॉर्ड्सचा हा सोहळा गुजरातमधील गांधी नगर येथे झाला. 2023 वर्षात अनेक मोठ्या फिल्म चाहत्यांच्या भेटीला आल्या. अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमावला. त्यापैकी काही चित्रपटांनी या सोहळ्यात बाजी मारली.

या अवॉर्ड्स सेरेमनीमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट अॅक्टर, बेस्ट अॅक्ट्रेस आणि लाइफ टाइम अचीवमेंट कुणाला मिळाली याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक होते. फिल्मफेयर अवॉर्ड्समध्ये ‘सॅम बहादुर’,’12th फेल’ , ‘अॅनिमल’ या चित्रपटांनी बाजी मारली. तर, शाहरुख खानची ‘जवान’ ही चांगलीच गाजली. या चित्रपटाला एक्शन-थ्रिलर फिल्मसह अनेक पुरस्कार मिळाले. याच सोहळ्यादरम्यान कार्तिक (Kartik Aaryan ) सोबत हा अपघात घडला.

News Title-  An accident happened with Kartik Aaryan

 महत्त्वाच्या बातम्या –

Bigg Boss 17 | डोंगरीचा स्टार मुनव्वर झाला मालामाल; ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रक्कम

Ahmednagar Accident | मन सुन्न करणारी घटना; कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, सहा महिन्यांच्या बाळासह…

Ncp | राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर!

Bigg Boss 17 | ..अन् अंकितासाठी पती विकी जैन ढसाढसा रडला; सलमान खानही झाला चकित

Animal Movie च्या टीकाकारांना रणबीर कपूरचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाला…