भंडारा महाराष्ट्र

प्रेमविवाह करणाऱ्या लेकीला हटकणं पित्याला पडलं महागात; संतापलेल्या पोरीनं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

भंडारा | प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला हटकणं एका पित्याला महागात पडलंय. भंडाऱ्यात एका संतापलेल्या मुलीने वडिलांवर उकळतं तेल टाकलं आहे. त्यामुळे तिचे वडील 40 टक्के भाजले आहेत.

संतापलेल्या मुलीने कढईतील उकळतं तेल वडिलांच्या अंगावर ओतल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील चिचगांवात ही घटना घडली आहे. या घटनेत तिचे वडील मनोज महादेव रामटेके 40 टक्के भाजले.

मनोज रामटेके यांच्या मुलीने प्रेमविवाह केला होता. पण घरगुती कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाले. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून ती माहेरी परत आली होती. मात्र काल रात्र तिचं आणि वडिलांसोबत भांडण झालं. त्या भांडणादरम्यान तिच्या वडिलांनी तिला प्रेमविवाह केल्यानंतर पतीला का सोडलं? तुझ्या वागणुकीत सुधारणा कर, असं म्हटलं. यानंतर मुलीने वडिलांच्या अंगावर कढईतील उकळतं तेल टाकलं.

या घटनेनंतर ती मुलगी पळून गेली. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलीचा शोध सुरु केला. ती मुलगी साकोली येथे नातेवाईकांकडे सापडली. तिला अटक करत कोर्टात हजर करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना रूपाली चाकणकरांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

दिलासादायक! आत्तापर्यंत पुण्यात 62 हजार रूग्ण कोरोनामुक्त

सुशांतच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत दाख

पुणेकरांसाठी गुड न्यूज; पुण्यातील बस सेवा ‘या’ तारखेपासून सुरू होणार

अग्निशामन दलाच्या जवानाचा केजरीवालांकडून सन्मान; कुटुंबियांना केली ‘ही’ मोठी मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या